लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल 4 चमचे
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल 4 चमचे
5-6 काजू
क्रमवार पाककृती:
मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यामुळे इतरत्र मिळणार्या शेंगदाण्याची चटणी वेगळी होते. त्यावर शोधून काढलेला हा पर्याय आहे.
भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि 2 चमचे शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.

मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.

गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये "विप"वर दोनचारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून ठेवावे.

यात लसून आला असेल तर तो काढून पुन्हा मिक्सरमध्ये घालावा. काजू टाकावेत.
आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.

आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात दोन चमचे शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी.

अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते. अन तोंपासु दिसते

वाढणी/प्रमाण:
झेपेल तेव्हढे ;)
अधिक टिपा:
यात शेंगदाणा तेलच वापरावे तरच चव पर्फेक्ट येते. इतर तेलांनी ती मजा येत नाही.
या चटणीत खाताना दही घालून खावे. एकतर चवही मस्त लागते अन पचायलाही बरे पडते
या चटणीत खाताना दही घालून खावे. एकतर चवही मस्त लागते अन पचायलाही बरे पडते
माहितीचा स्रोत:
माझा नवरा सोलापूरला राहिलेला. पुण्यात अनेक वर्षे राहिला तरी त्याला सोलापूरचे भारी प्रेम :( लग्न झाल्यापासून सोलापूरच्या चटणीची अती कौतुकं ऐकली. अन माझी नेहमीच्या पद्धतीची चटणी नाकं मुरडत खालेली. मग एकदा सोलापूरची चटणी बघितली, खाल्ली. अन मग केला हा प्रयोग. आता अगदी नावाजत खातो :)
No comments:
Post a Comment