- चिकन बिर्याणी
साहित्य :
एक किलो चिकन, तीन वाट्या दिल्ली राईस, तमालपत्र 2-3, मसाला वेलची एक, साधी वेलची3-4, मिरे 8-10, काजु 10-12( पाकळ्या सुट्या करून घ्या), उभे चिरलेले मोठे4-5 कांदे, पुदिना किमान चार मुठी, दही 3 मोठे चमचे, आलं लसूण पेस्ट 3 चमचे, हळद, तिखट, मीठ, तेल तळणासाठी, साजुक तूप 6 चमचे, एक टॉमेटो बारीक चिरून, कप भर दूध, 8-10 केशराच्या काड्या
कृती:
दिल्ली राईस तांदूळ भिजवून निथळत ठेवा. (माझ्याकडचा दिल्ली राईस संपलेला म्हणून बामती वापरला. पण त्यात मजा नाही)
कांदे उभे चिरून रुमालावर पसरून ठेवा
पुदिना धुवून बारीक चिरून ठेवा
चिकन धुवून त्याला दही, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडा पुदिना लाऊन ठेवा
कांदा तेलात तळायला घ्या
दुसरीकडे पसरट भाड्यात, 3 चमचे साजुक तुपात तमालपत्र, मिरे, मसाला वेलची, साधी वेलची, काजू परतून घ्या
त्यावर निथळत ठेवलेले तांदूळ परता. आधण आणि मीठ टाकून भात मोकळा शिजवून घ्या
शिजलेला भात परातीत निवत ठेवा. याच वेळेस तमालपत्र, मिरे , मसाला वेलची, साधी वेलची वाटलं तर काढून टाका
पसरट मोठ्या पातेल्यात 3 चमचे साजूक तुप टाकून बारीक चिरलेला टॉमेटो परता
त्यावर मॅरिनेटेड चिकन चांगले परता
आता अर्धे चिकन बाऊलमधे काढून ठेवा आणि उरलेल्या चिकनवरती तळलेला 1/3 कांदा टाका
त्यावर अर्धा भाग भात पसरा, वर पुदिना1/3 भाग पसरा
त्यावर 1/3 कांदा, बाजुला काढून ठेवलेले चिकन, उरलेला कांदा, उरलेला पुदिना पसरा
आता बाजूला ठेवलेला भात पसरा
ज्या बाऊलमधे चिकन काढून ठेवलेले त्यात अर्धाकप दूध ओता. भांडे निपटून घ्या. त्यात केशर टाका. हे दूध बिर्याणीवरती पसरा
कणकेमधे पाणी घालून भिजवा
बिर्याणीवरती घट्ट झाकण ठेऊन झाकण-भांड याच्या फटीवर कणीक लावा. पाण्याचा एक हात फिरवा.
खाली जाड तवा ठेऊन बारीक आचेवर किमान एक ते दिड तास ठेवा. नंतर गॅस बंद करून 15 मिनिटांनी बिर्याणी ताटात वाढून घ्या
6-8 जणांसाठी भरपूर होईल.
——--------------+
तंदूरी चिकन
लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
चिकन १ किलो
वाटणासाठी :
आलं १ इंच
लसून २०-२५ पाकळ्या
मिरच्या ४
हळद १ चमचा
तिखट २ चमचे
मीठ १ चमचा
लवंग ४
दालचिनी मोठे ५-६ तुकडे ( हे जास्तच हवेत)
मीरे ५-६
खसखस १ चमचा
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
शहाजिरे १ चमचा
दही पाव किलो
लाल रंग २ चिमुट ( ऑप्शनल पण मजा आणणारा )
ओवा ( ऑप्शनल, कधी घाला कधी घालू नका, जरा व्हरायटी )
सजावटीसाठी :
लिंबू हवे असल्यास वरून
२ कांदे उभे चिरून व्हिनिगार, मीठ घालून + थोडा उभा- पांतळ चिरलेला कोबी
क्रमवार पाककृती:
चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. सर्व तुकड्यांना सुरीने मध्ये मध्ये हाडापर्यंत छेद द्यावेत.

सर्व फ्रिजमध्ये ठेवावे. (फ्रिजर नाही)
वाटणासाठीचे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटुन घ्यावेत. खसखस वाटायला जरा वेळ लागतो. त्यामुळे जरा जास्त वेळ फिरवावे.
आता हे सगळे वाटण चिकनला चोळावे.
छेद दिलेल्या ठिकाणी आत पर्यंत जाईल असे पहावे. हे सर्व फ्रिजमध्ये ६-८ तास ठेवावे.
ओव्हन १५० तपमानाला ५-७ मिनिटे प्रिहिट करत ठेवा. आता प्रत्येक तुकडा फॉईलमध्ये गुंडाळून ट्रे मध्ये ठेवा. आता ओव्हनमध्ये १५० तापमानावर साधारण २० मिनिटे शिजवा.
वाढताना प्रत्येक तुकडा फॉईलमधून काढून त्यावर १ छोटा चमचा ( भातुकलीतला) अमूल बटर टाकून चिमट्यात पकडून गॅसवर धरा. मस्त धूर झाला, तुकडा जळकट दिसायला लागला की ताटलीत घ्या. सोबत लिंबू, कांदा घ्या, फस्त करा
मी इन्फ्रामॅटिक्स मध्ये भाजले चिकन.
इन्फ्रामॅटिक्स मध्ये भाजले जाताना

तयार तंदूरी चिकन

वाढणी/प्रमाण:
माझा लेक अन त्याचे तीन दोस्त फस्त करतात. पण किमान सहा जणांना पुरावी.
अधिक टिपा:
१. मॅरिनेट कर
ण्यासाठीचा वेळ यात धरलेला नाही
२. चिकन बाहेर ठेवणार असाल तर ४ तास ठेवावे. भारतात शक्यतो बाहेर ठेऊ नये. हवा बदलती असल्याने उगाच टेन्शन नको. मी शक्यतो रात्री लावून फ्रिजमध्ये टाकते. दुसर्या दिवशी ९ वाजता बाहेर काढून १२ वाजता करायला घेते.
३. फॉईलमध्ये गुंडाळल्या मुळे चिकन सुके होत नाही, रबरीही होत नाही.
४. दही घातलेले असल्याने लिंबू वरून पिळताना सांभाळून. दही किती आंबट आहे याचा अंदाज येत नाही, म्हणून.
५. हे सर्व प्रमाण झणझणीत खाणा-यांसाठी आहे, कृपया नोंद घ्यावी. त्यातून कोणी हे लक्षात न घेता केले अन तिखट लागले तर मला फोन करावा. मी अन माझा लेक हाजीर होऊ
६. माझ्याकडे हॉकिन्सचे इन्फ्रामॅटिक्स असल्याने त्यात फार भारी अन भराभर होते तंदुरी

माहितीचा स्रोत:
फार फार पूर्वी एका ढाब्यावरचे खाऊन त्याची चव आठवून आठवून तयार केलेली माझीच पाककृती :)
____________________________________________________________________________
चिकन सुहाना
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
चिकन 1/2 किलो
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे
क्रमवार पाककृती:
चिकन स्वच्छ धुऊन , हळद, तिखट, मीठ, व्हिनिगर लावुन ठेवावे.
कांदे जाडसार चिरावेत.
चिरलेल्या कांद्यातला १/३ कांदा, लसूण, अालं, बडिशेप, खसखस, कोथिंबीर, धणे, काजू सर्व वाटावे. हे वाटण चिकनला लावावे. किमान १/२ तास चिकन मॅरिनेट करावे.
पसरट भांड्यात ( लगडी किंवा फ्राय पॅन ) बटर आणि तेल तापत ठेवावे. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांद्याचा रंग बदलु लागला की त्यात चिकन टाकावे. चांगले परतावे. चिकनचा रंग बदलु लागला की २ वाट्या पाणी घालावे. उकळी आली की झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे. साधारण २५ मिनिटांनी तयार होईल चिकन सुहाना !

दोघांना पुरावे
अधिक टिपा:
जितके जासत मॅरिनेट कराल (१/२ तास ते ४ तास) तेव्हढे लवकर शिजेल, अन चवही छान लागेल.
माहितीचा स्रोत:
माझेच प्रयोग. हे चिकन परतत असताना खुप छान वास येत होता, म्हणून त्याचे नाव ठेवले 'चिकन सुहाना' :-)
___________________________________________________________________________________
हेल्दी चिकन अर्थात बिना तेलाची पौष्टिक कोंबडी
लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
चिकन १/२ किलो
कांदे २
टॉमेटो १ मोठा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
लसूण १०-१२ पाकळ्या (मोठा असतील तर ७-८)
आलं १/२ इंच
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
लवंगा ५, मिरे ५
पुदिना अर्धी जुडी
पालक ८- १२ पानं
दही २ चमचे
कांदे २
टॉमेटो १ मोठा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
लसूण १०-१२ पाकळ्या (मोठा असतील तर ७-८)
आलं १/२ इंच
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
लवंगा ५, मिरे ५
पुदिना अर्धी जुडी
पालक ८- १२ पानं
दही २ चमचे
क्रमवार पाककृती:
चिकन स्वच्च धुवून मोठ्या भांड्यात ( ज्यात आपल्याला शिजवायचे आहे त्यातच ) ठेवावे.
कांदे बारीक चिरून त्यात घालावेत.
टॉमेटो बारीक चिरून त्यात घालावा.
आता बाकीचे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घावे. ( थोडे जाडसर वाटले तरी छान लागते ) हे वाटण चिकनच्या भांड्यात ओता. चिकन, कांदे, टॉमेटो, मसाला सगळे नीट एकत्र करून २० मिनिटे झाकून ठेवा.
आता झाकणासकट भांडे मंद गॅस वर ठेवा. अधून मधून आवश्यक तर हलवा. अर्ध्या तासात चिकन शिजेल.

खवय्ये असतील तर दोघांनी पुरवुन खावे :)
अधिक टिपा:
याला फार रस्सा नसल्याने फुलकीशी चांगले लागते.
याच प्रकाराने पुलावाही करता येते. वर सांगितल्या प्रमाणे चिकन अर्धेअधिक शिजले की यात धुवून ठेवलेला तांदूळ टाकावा, तांदळाच्या प्रमाणात मीठ, तिखट, पाणी टाकावे, काजू टाकावेत अन पुलावा शिजू द्यावा. तांदूळ शिजले की अर्धा वाटी दुधात केशर खलून पुलाव्याला भोकं पाडून त्यात हे दूध घालावे. झाकण ठेऊन ५ मिनिटे वाफ काढावी. चिकन पुलावा तयार !

माझेच प्रयोग
____________________________________________________________________________
मस्साला चिकन
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
चिकन अर्धा किलो
कांदे २
लसूण १२ पाकळ्या
आलं अर्धा इंच
हिरवी मिरच्या २
टॉमेटो २
हळद अर्धा चमचा
तिखट १ चमचा
मीठ अर्धा चमचा
लवंगा ५
मिरी ८
दालचिनीचा तुकडा १ इंच
खसखस १ चमचा
बडिशेप १ चमचा
धणे १ चमचा
ओवा अर्धा चमचा
कसुरी मेथी १ चमचा
दही २ चमचे
तेल ४ चमचे
एक कप पाणी
कांदे २
लसूण १२ पाकळ्या
आलं अर्धा इंच
हिरवी मिरच्या २
टॉमेटो २
हळद अर्धा चमचा
तिखट १ चमचा
मीठ अर्धा चमचा
लवंगा ५
मिरी ८
दालचिनीचा तुकडा १ इंच
खसखस १ चमचा
बडिशेप १ चमचा
धणे १ चमचा
ओवा अर्धा चमचा
कसुरी मेथी १ चमचा
दही २ चमचे
तेल ४ चमचे
एक कप पाणी
क्रमवार पाककृती:
१. चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
२. लसूण, आलं, हिरवी मिरच्या, हळद, तिखट, मीठ, लवंगा, मिरी, दालचिनी, खसखस, बडिशेप, धणे, दही हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
३. हे वाटण चिकनला लावून ठेवावे.
४. कांदे बारीक चिरून घ्यावेत.
५. टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत.
६. पसरट भांड्यात तेल तापवून त्यात चिरलेले कांदे घालावेत. कांदे लाल झाले की त्यात चिरलेल टॉमेटो टाकावेत.
७. तेल सुटे पर्यंत परतावे.
८. आता त्यात वाटण लावलेले चिकन टाकावे. कसूरी मेथी आणि ओवा त्यात टाकावा. आता हे सगळे पुन्हा नीट परतावे. किमान ५-८ मिनिटं.
९. यात पाणी घालावे, व हलवावे. उकळी आली की झाकण ठेऊन १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
१०. ५ मिनिटांनी वाफ जिरल्यावर "मस्साला चिकन" तयार !

तिघांसाठी पुरावे :)
अधिक टिपा:
हे चिकन सुके असल्याने फुलक्यांबरोबर छान लागते. किंवा नुसतेही मस्त लागते 
माहितीचा स्रोत:
माझेच प्रयोग :)
____________________________________________________________________________
____________________________________________________________________________
No comments:
Post a Comment