लागणारा वेळ:
२५ मिनिटे
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
प्रथम काही गोष्टी स्पष्ट कराव्यात असे वाटले. सी. के. पीं. मध्ये मूग, वाल आणि चवळी यांचा विशिष्ठ पद्धतीने केलेल्या रश्श्याला "बिरडं" ही उपाधी
लावली जाते.
लागणारे जिन्नस : मूग - आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे. रात्री पातळ फडक्यात बांधून ठेवायचे. दुसर्या दिवशी कोमट पेक्षा थोडे गरम पण उकळत्यापेक्षा गार अशा पाण्यात मोड आलेले मूग टाकावेत. १० मिनिटांनी मोड तुटणार नाहीत ही काळजी घेत हलक्या हाताने थोडे चुरावेत. मग भांडे हळू ( पीठ चाळताना जशी चाळणी हलवतो तसे) हलवत त्यातले पाणी दुसर्या भांड्यात ओतत जावे. पाण्याबरोबर सालंही सुटत जातात. असे २-३ दा करत बहुतांशी साले सुटून जातात. मग न सुटलेले मूग सोलावेत. प्रत्येक मूग सोललेलाच असला पाहिजे. बिरड्यात साल तरंगताना दिसले तर आमची सी. के. पी. जात बुडते
तर असे पूर्ण सगळे
१. सोललेले मूग २ वाट्या
२. अर्धा खोवलेला ओला नारळ ( यात खोबर्याची तपकिरी साल थोडे जरी आले तरी जात बुडते, लक्षात घ्या )
३. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
४. १/२ इंच आलं
५. दोन बारीक चिरलेले कांदे
६. लिंबा एवढा चिंचेचा गोळा / कैरी मिळाल्यास मध्यम आकाराची अर्धी कैरी -चार भाग करून
७. चिंचेच्या निम्म्याने गूळ
८. थोडी कोथींबीर
९. तेल, हळद, हिंग, तिखट, धणेजिरे पूड, मीठ चवीनुसार ( यातही तिखट = सी. के. पी. तिखट =लाल संकेश्वरी मिरच्या [डेखं तोडलेल्या] + धणे + बडिशेप यांचे खास प्रमाण )

क्रमवार पाककृती:
१. चिंच अर्ध्यावाटी पाण्यात भिजत घालावी.
२. ४ मोठे चमचे तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात आधी कांदे परतावेत.
३. कांदे लालसर झाले की त्यात मूग टाकावेत, त्यात हळद, तिखट, धणेजिरे पूड टाकावे. हे सर्व मंद गॅसवर किमान ७-१० मिनिटं परतावे.
४. हे परतणे चालू असताना, ओले खोबरे व लसूण एक कप पाण्यात बारीक वाटून घ्यावे. चिंचेचा कोळ काढून घावा.
५. आता परतलेल्या मूगात २ कप पाणी घालावे व २ उकळ्या आल्यावर झाकण ठेऊन मूग शिजू द्यावेत.
( अरेच्च्य्या एक सांगायचं राहिलच. झाकण खोलगट घेऊन त्यात पाणी घालावे, अन अजून पाणी लागले तर हे वरच्या झाकणातलेच पाणी टाकावे नाही तर पुन्हा जात बुडण्याचा संभव आहेच )
६. मूग शिजल्यावर त्यात वाटण, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, चिरलेली कोथींबीर टाकून एक उकळी आणावी.
७. बाजारात कैर्या मिळत असतील तर चिंचे ऐवजी कैरीच वापरली पाहिजे असा ही दंडक आहे. ( मला स्वतःला असे कैरी घातलेले बिरडे जास्ती आवडते हे खरे )
हे सी.के.पी. पद्धतीचे मूगाचे बिरडे !
हुश्श्य !
आता माझ्या या सगळ्या लेखनाबद्द्ल मला जाती बहिष्कृत करण्यात आलं असेल बहूदा. आता याला जबाबदार तुम्ही सगळे !

वाढणी/प्रमाण:
सी.के.पी. व्यव-ती असल्यास २ व्यव-तींना पुरेल. अन्यथा चार व्यव-तींना पुरेल
अधिक टिपा:
मी स्वतः सी.के.पी. आहे. अन सी.के.प्यांच्या स्वयंपाका बद्दल मला सार्थ अभिमान आहे तरी हे लिहिले आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आधीच मनापासून माफी मागते__/\__
माहितीचा स्रोत:
माझी सी. के. पी. जात :)