कपभर साबुदाणा आधी नीट धुवा।
पांढरं पाणी गेलं की बाऊलमधे साबुदाणा भिजून वर अर्धपेर पाणी येईल असं भिजवा। रात्रभर।
सकाळी ताटात पसरून ४ चमचे दुध वरून टाका।
एक मोठा बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून चिरायचे। मिरच्या ३-५मोठे तुकडे
दाणे मुठभर मंद गॅसवर भाजून सोलून दाण्याचे कुट करणे
हे झाल्यावर कुकरमधे पाणी घालून स्टँड ठेवून त्यावर कुकरच्या मोठ्या भांड्यात भिजवलेला सादा, त्यात चमचाभर तेल साखर मीठ(सादापुरतं) घालून मिक्स करू, शिटी काढून झाकण लावून १० मि वाफवत ठेवावा
दुसरीकडे तुप/तेल पॅनमधे तापवून जिरे घालून त्यावर बटाट्याचे तुकडे टाकायचे।मोठ्या गॅसवर जरा परतून मग ग॓स बारीक करून झाकण ठेवायचं।
कुकरची १० मि झाली असतील मग गॅस बंद करून सादा काढून ताटात पसरायचा। जरा चिकट वाटेल घाबरू नका। जरा पसरून गार होऊ दे
एव्हाना बटाटा शिजत आला असेल। तो शिजलाय बघून त्याच्यापुरतं मीठ टाका। त्यावर सादा टाका परता। दाकु टाका ५ मि परता। मऊ मोकळी खिचडी तयार








ही भाजी वाफेवरच करायची असल्याने तेल अंमळ जास्ती लागते. शिवाय सुरण, गराडू वगैरे कंद असल्याने तेल आवश्यक असतं. तरीही आपापल्या आवडीनुसार कमी करू शकता.