मूग, हरबरा, उडिद, तूर, मसूर सगळ्या डाळी 5-5 चमचे रात्री बिझत घालणे.
एक वाटी इडली रवा रात्री भिजत घालणे.
सकाळी सगळं भरडसर वाटून घेणे.
मका, मटार 5-5 चमचे घेऊन ते पाण्यात उकळत ठेवणे.
एका बाऊलमधे भरड वाटलेल्या डाळी, भिजवलेला इडली रवा एकत्र करावे.
कांदा, कांदापात, सिमला मिरची सगळे बारीक चौकोनी चिरून घ्यावे. गाजर किसून घ्यावे. हे सगळे 5-5 चमचे पिठात घालावे. आता उकडलेले मटार, मका दाणे पाण्यातून काढून तेही पिठात टाका.
7-8 मिरे खरडून घ्या. ते पिठात टाका.
हिरव्या मिरच्या 2-4 बारीक चिरून पिठात टाका.
आता पिठात मीठ घालून, हवे तसे पाणी घालून सरसरीत भिजवा. फार पांतळ नको.
अर्धातास झाकून ठेवा.
नंतर अप्पे पात्रात थोडे तेल टाकून 1-1 चमचा मिश्रण टाकून झाकण ठेऊन 3-4 मिनिटं बारीक गॅसवर शिजू द्या . झाकण काढून पलटवा, गॅस मोठा करून 2 मिनिट ठेवा. मग काढून सॉर, चटणी या सोबत सर्व्ह करा.




ही भाजी वाफेवरच करायची असल्याने तेल अंमळ जास्ती लागते. शिवाय सुरण, गराडू वगैरे कंद असल्याने तेल आवश्यक असतं. तरीही आपापल्या आवडीनुसार कमी करू शकता.








