साहित्य :
चिकन 500 ग्रॅम
दही 3 चमचे
१ चमचा आलं लसूण पेस्ट
लसूण ४-५
तिखट 1 चमचे,
हळद ¹/² चमचा
मीठ 1चमचा
गरम मसाला 1¹/² चमचा ( बडिशेप, धणे, लवंग, मिरे, दालचिनी यांची पूड)
तेल 3-4 चमचे
कांदे मोठे तीन
खोबऱ्याचे काप पाव वाटी
टॉमेटो 2
कृती:
1. चिकन स्वच्छ धुवून, निथळून त्याला दही, हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून घेणे.
2. २ कांदे उभे चिरून घेणे.
3. १ कांदा, टॉमेटो बारीक चिरणे.
4. पॅन मधे अर्धा चमचा तेल तापवून त्यात उभा चिरलेला कांदा, कोथिंबीरीच्या काड्या, लसूण लाल होई पर्यंत परतणे. ते काढून त्याच पॅनमधे खोबऱ्याचे काप लालसर परतने. हे सर्व मिक्सरमधे बारीक वाटून घेणे.
5. मोठ्या भांड्यात २ चमचे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा टाकणे. तो ट्रान्सपरन्ट झाला की त्यात टॉमेटो परतणे.
6. त्यात चिकन टाकून परतणे.
7. आता त्यात वाटण टाकून थोडावेळ परतावे.
8. चिकनचा रंग पांढरा झाला की १ कप पाणी, गरम करून टाकणे.
9. सगळे उकळले की गॅस बारीक करून झाकण ठेऊन शिजवणे.
10. १५ मिनिटांनी हलवणे. हवे तर पाणी अजून अर्धाकप घालणे.
11. साधारण 20 मिनिटांनी चिकन शिजेल. वरून कोथिंबीर टाकावी.
12. शेवटी चव चाखून बघणे. तिखट मीठ अॅडजेस्ट करणे.